Available in staff pageinfo@sanegurujividyamandir.com

About us

You are here

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेल्या सानेगुरुजी विद्यालयाचे नाव घेत क्षणी डोळ्यासमोरून एका मनमोहक प्रयत्नांचे फळ काय असते ते सरकून जाते ही फक्त साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय किंवा साने गुरुजी कन्या शाळा एव्हढेच न राहता तो एक सळसळता उत्साह प्रचंड उर्जेच उगमस्थान विविध उपक्रमांची खाण; लोकशाहीवरील श्रद्धा दृढ होण्यास मदतच होईल अशा वक्त्यांची मांदीयाळी, सांस्कृतिक कार्यक्रमांची सततचा राबता जिवंत क्रीडांगण, हसरे वातावरण, काहीही परवानगी घेऊन करायला मान्यता, विद्यार्थ्यांचे अमाप कौतुक पालकांसोबत घरपर्यंत शिक्षकांचे सहज येणेजाणे व यातून व्यक्तिमत्वाचा खुलत जाणारा प्रवास थक्क करतो.

या प्रयत्नात शाळा सुरूच झाली मुळात सानेगुरुजींच्या कर्मभूमीत सानेगुरुजींच्याच प्रेरणेने भरणाऱ्या राष्ट्रसेवादलाच्या शाखेवरून ह्या मैदानात सेवादलाची शाखा शिकवनी वर्ग चालवीत असे त्याच वर्गाचे रुपांतर हायस्कूल स्थापण्यात व त्याचा वटवृक्ष होण्यात गुरुजींच्या विचारांचाच वाटा मोठा कारण गुरुजींच्याच विचाराने प्रेरित होऊन संस्थापक अध्यक्ष मा. आ. साथी गुलाबराव वामनराव पाटील यांनी मराठी शाळा चालविली होती व त्याचेच पुढचे पाउल म्हणून हायस्कूल व हायस्कूलने गती घेणे व जगाचे दरवाजे खुले होणे एकमेकास पूरकच ठरले सर्वसामान्यांची शिक्षणाची आस वाढली सामान्य नागरिक देखील आपल्या अपत्याने शिकावे, पुढे जावे या जाणीवेने कुठे चांगले शिक्षण मिळते ते शोधायला लागली व तो शोध संपला साने गुरुजी हायस्कूल या नावापाशी…

सानेगुरुजी हायस्कूल या नावाच्या स्थानकावरील इतरांना भेटल्याशिवाय राहवत नाही. या शाळेचे दोन्ही मुख्याध्यापक आपापल्या स्वभाववैशिष्ट्याने सर्वपरिचित आहेत दोन्ही म्हणजे नूतन चे मुख्याध्यापक देशमुख सर व कन्याचे मुख्याध्यापिका बोरसे बाई दोन्ही जण विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात व आदर्श शिक्षक म्हणूनच परिचित. ह्या दोन्ही शाळा एकाच नाण्याच्या दोन बाजू व ह्या दोन्ही शाळा अस्तित्वाने सरकारी नियमाने वेगळ्या मात्र या दोन्ही शाळांना एकत्र ठेवण्यात दोन्ही शाळांचे क्रीडाशिक्षकांचे योगदान कोणीच नाकारू शकणार नाही कारण मैदानावर खेळाचा सराव एकत्रच घेण्यात सहली किंवा इतर सारे उपक्रम एकत्रित पणे घेण्याकडेच घोरपडे सर व चौधरी सरांचा कल असतोच याची पक्की खात्री मुलामुलींना असल्याने कुठलीही अडचण या दोघांपैकी एकाला जरी सांगितले तरी आपले काम होणार याची शाश्वती मुलांना मिळाली एकप्रकारे फेविकॉलचेच काम या दोघांनी केले व अनेकांना जोडत ठेवले.

स्काउट आणि गाईडने तर या शाळांना काम करण्याची मोठीच संधी उपलब्ध करून दिली व या संधीचे सोने करण्यात पुढे राहण्यात जे. एस. पाटील, विद्या पाटील, जोंधळे बाई, वैद्य बाई, दिलीप पाटील, डी. के. पाटील, सावन महाजन...

सानेगुरुजी शाळेत जे होणार ते वैशिष्ट्यपूर्णच असणार याची प्रत्येकाला खात्री यामागे या शाळांच्या शिक्षकवर्गाने अहोरात्र घेतलेले कष्ट वापरलेली कल्पकता सातत्य नाविन्याचा स्वीकार व अत्यंत तळमळीची प्रामाणिकता यातूनच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दुणावत जायचा साधी सहल काढायची त्याची तयारी अहोरात्र करून सहलीचा पुरेपूर आनंद विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी सर्व आघाड्यांवर शिक्षक कामाला जुंपून घेणार मग जेवण, निवास, प्रवास ठिकाणांचा धांडोळा घेऊन इतरांपेक्षा निम्या खर्चात सहल यशस्वी करण्याचे कसब पाहायला मिळेल येथेच.

गुणवत्ता देखील निर्विवाद मुलांना संस्कारच असे केले की प्रामाणिकपणे मिळालेले ४०% गुण जीवनाला १००% आधार देतील म्हणून "खंत" नावाचा कॉपीमुक्त परीक्षा घेवून मुलांचे जीवन सात्विक आनंदाने तृप्त केले. त्या सोबतच सरकारने निर्माण केलेला परीक्षा बंदीचा पेच "वर्ष गुणवत्तेचे माझ्याच इयत्तेचे" या प्रोजेक्टच्या माध्यमातून सोडविला तो शिक्षकांनीच.

आज समाजात शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत असतांना आपल्या शाळेत तो दुनावतांनाच आढळतो व अशा वेळी शाळा वयाची २५ वर्षे पूर्ण करतांना आपली पिले कोठवर पोहोचली याचा शोध शाळा शिक्षकांच्या साहाय्याने घेत आहे कारण सरकारची धोरणे बदलली मात्र आमची तळमळ तीच आहे सरकारने हात आखडता घेतला मात्र आपण देणे लागतो हा भाव तोच आहे नाविन्याची आस तेवढीच ताजी आहे. मग आपल्या पाखरांनी जगात जाऊन काय मिळवले ते पाहूया व आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी जे जे देता येईल त्यासाठी एकत्र येऊन जुन्या आठवणींना गोंजारतांना आपला अल्पसा सहवास शाळेला अधिक बलवान करेल यात शंका नाही.

म्हणूनच या, पहा, तृप्त व्हा मग पुढे जा...